Saturday, March 14, 2009

"पाय्‌ डे"

तारीख लिहीण्याच्या अमेरीकन पद्धतीनुसार आजची तारीख ही ३.१४ अशी लिहीतात कारण ह्या पद्धतीत महिना दिवसाच्या आधी लिहीतात. 3.14 ही अर्थात π ची 2 शतांशपर्यंतची सर्वात जवळची संख्या आहे. त्यामुळेच ह्या दिवषी "पाय्‌ डे" ("पाय्‌ दिन") साजरा करतात. लॅरी शॉ ( Larry Shaw ) ह्या भॉत्तिक शास्त्रज्ञाने सर्व प्रथम ही प्रथा सुरु केली. पा‍य्‌ मिनीट हे आज दुपारी 1:59 वाजता मानले जाते. कारण π ची किंमत थोड्या अधिक अंकापर्यंत काढल्यास 3.14159 आहे. ह्या दिवशी अमेरिकेत शाळांमध्येही काही कार्यक्रम आयोजित केले जातात.
π ची व्याख्या आपल्याला आठवत असेलच. π = वर्तुळाचा परिघ / वर्तुळाचा व्यास
आपल्याला शाळेत असताना ह्याची किंमत अंदाजे 22/7 अशी सागितलेली असते. पण π ही एक अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध केले गेले आहे. त्यामुळे त्याची किंमत अ/ब स्वरुपात मांडली जाउ शकत नाही. π ची अधिक अधिक योग्य किंमत काढण्याचे प्रयत्न सतत चालूच असतात. त्यातिल सध्याचा विक्रम टोकयो विद्यापिठाचा आहे. त्यांनी π ची किंमत 1.24 ट्रिलीयन स्थानांपर्यंत काढली आहे. ( 1 ट्रिलीयन = 1 000 000 000 000, दहाचा 12 वा घात ). अर्थात त्यांनी ह्या साठी सुपर कॉंम्पुटरचा वापर केला आहे.

तुम्हाला ठाउक आहे π हे चिन्ह कोणत्या प्रसिद्द गणितज्ञामुळे मोठ्याप्रमाणात वापरले जाउ लागले ?
π ची किंमत 3 आकडी संख्यांच्या भागाकाराने लिहायची झाल्यास सर्वात उत्तमरित्या ती कशी लिहीता येते ?

आजच्या दिवसाचे अजून एक महत्व म्हणजे आज प्रसिद्द शास्त्रज्ञ आलबर्ट आनस्टाईन ह्याचा जन्मदिवस! ( 14 मार्च 1879 ).

1 comment: