Wednesday, April 1, 2009

एप्रिल फुल - 1 ( एप्रिल फुल आणि तर्कशास्त्र )

Raymond Smullyan हे कोड्यांची पुस्तके लिहिणारे एक प्रसिद्द लेखक ( शिवाय गणितज्ञ, तर्कशास्त्रचे प्राध्यापक, तत्वज्ञ, जादूगार आणि संगितकार!). त्यांनी त्यांच्या लहापणीची एक आठवण त्यांच्या What is the name of this Book ? ( अफलातून नावाचं मस्त पुस्तक ! )

आठवण थोडक्यात अशी आहे:
"माझी तर्कशास्त्राशी ओळ्ख वयाच्या 6 व्या वर्षी झाली. काय झाल की: दिनांक 1 एप्रिल 1925 साली मी पोटदुखिने की तापाने आजारी होतो. सक्काळीच माझा दादा Emile ( माझ्या पेक्षा 10 वर्षांनी मोठा ) माझ्या बिछान्या जवळ आला आणि म्हणाला "Raymond लक्षात ठेव आज 1 एप्रिल, आज मी तुला असा फसणार की तुला चांगलच लक्षात राहील !" मी पूर्ण दिवस खूप सावधपणे वाट पाहाण्यात घालवला. पण दादानी मला फसवलच नाही. खूप रात्र झाली, आई आली. बघते तर मी जागाच. आईने विचारले "झोपला का नाहिस ?" मी उत्तर दिल "मी सावध पणे वाट पाहातोय, दादा कधी फसवतोय त्याची." आई वॅतागली Emile ला म्हणाली "Emile बाबारे फसव एकदाचं या पोराला!". आणि माझा आणि Emile दादाचा संवाद झाला:

Emile: "हं, म्हणजे तू मी फसवण्याची वाट पहात होतास ?"
Raymond: "हो"
Emile: "पण, मी तुला फसवल का?"
Raymond: "नाही"
Emile: "पण, तू अशी अपेक्षा करत होतास की मी तुला फसवणार, बरोबर ?"
Raymond: "हो, बरोबर"
Emile: "म्हणजे मी तुला फसवलं, होना ?"

दिवे मालवल्यावर देखिल मी बराच वेळ अंथ्ररूणात पडून विचार करत होतो की मी खरोखरच फसवला गेलो होतो की नव्हतो ?. एक विचार असा येत होता की जर मी फसवला गेलो नव्हतो तर मला ज्याची अपेक्षा होती ते घडलं नव्हतं आणि म्हणून मी एका अर्थी फसलो होतो. ( हेच तर Emile दादाचं म्हणणं होतं.) पण दूसरा विचार मनात येत होता: जर मी फसवला गेलो होतो, तर तेच घडल ज्याची मी अपेक्षा करत होतो! आणि मग मी कोणत्या अर्थी फसलो होतो ? आणि मी ह्याच विचारांनी गोंधळो होतो की शेवटी मी फसलो होतो की नव्हतो ?"