Tuesday, March 24, 2009

Ada Day 2009 post - डॉ. प्रियदर्शिनी कर्वे

आपल्या देशाला ऊर्जेच्या अपारंपारिक स्रोतांच्या विकासावर आणि वापरावर भर देण्याची आवश्यकता आहे. ह्या विषयावर सातत्याने कामकरणा‍र्‍यां मधिल एक प्रमुख संशोधक म्हणजे डॉ. प्रियदर्शिनी कर्वे ( Dr. Priyadarshini Karve ). त्यांनी पुणे विद्यापीठातून भॉत्तिक शास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. त्या मागिल 15 वर्षे बायोमास उर्जे संबंधि संशोधनात मग्न आहेत.

त्या 2002 सालचे ऍशडेन ट्रस्ट्चे जग प्रसिद्द पारितोषिक मिळवणा‍र्‍या टिमच्या मेंबर होत्या.


त्या सध्या 2 विद्यार्थाच्या प्रबंध निर्देशक देखिल आहेत.

त्यांच्या संशोधना विषयी थोडक्यात माहिती त्यांच्या वडिलांच्या मुलाखतितून :
( myboli.com वरुन )

"चिन्मय : आपल्याला पहिला ऍश्डेन पुरस्कार जो मिळाला तो उसाच्या पाचटापासून केलेल्या कांडीकोळशासाठी..
डॉ. कर्वे : माझी मुलगी, प्रियदर्शिनी, लहानपणी फलटणलाच वाढली. तिथल्याच शाळेत शिकली. ते सबंध उसाचंच क्षेत्र असल्यानं तिनं बघितलं होतं की, कापणी झाल्यानंतर वाळलेल्या पानांचा साधारण फूटभर उंचीचा थर शेतात राहतो. साखर कारखाने फक्त खोडं घेऊन जातात, पाला मागंच राहतो. आणि त्याचा शेतकर्‍याला काहीच उपयोग नसतो. गुरं खात नाहीत, तो कुजत नाही. उलट पुढची नांगरण, मशागत करायला त्याची अडचणच होते. त्यामुळे तो पाला जागेवरच पेटवून देतात. आणि अशी पेटलेली शेतं प्रियदर्शिनीनं बघितली होती.

इथे आमच्या संस्थेत जेव्हा चुलीचं काम सुरू झालं, तेव्हा तिला असं वाटलं की, हा पाला जर आपण चुलीत जाळू शकलो, तर तो कारणी तरी लागेल. म्हणून त्या दिशेनं तिने प्रयत्न करायला सुरुवात केली, आणि तिच्या असं लक्षात आलं की, त्या पाल्यापासून इंधन बनवायचं असेल तर कोळसा करणं हे सगळ्यांत सोपं आहे. तिने मग या प्रकल्पावर काम करायला सुरुवात केली. भट्टी कशी असावी, हा मुख्य मुद्दा होता. ही भट्टी लहान, हाताळायला सोपी, अशी हवी होती. कारण हा जो शेतीतला त्याज्य माल आहे, तो ठिकठिकाणी विखुरलेला आहे. तो अतिशय हलका असतो, त्यामुळे एकावेळी दोन टनांपेक्षा अधिक माल ट्रकमधून नेता येत नाही. पण पैसे मात्र दहा टनांचे द्यावे लागतात. त्यामुळे जिथे माल आहे, तिथे ही भट्टी नेता आली पाहिजे. तर या भट्टीचं तंत्र प्रियदर्शिनीने शोधून काढलं, आणि या भट्टीचं व्यावसायिकरण मात्र आमच्या इतर संशोधकांनी केलं. त्यानंतर आता आम्ही जी भट्टी तयार केली आहे, ती आधीच्या भट्टीपेक्षाही हलकी आहे. वापरायला सुटसुटीत आहे."

त्यांचे
ऊर्जेच्या शोधात हे पुस्तक प्रसिद्द आहे.
त्यांना
World Technology Award 2005, हे वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्क तर्फ़े दिले जाणारे पारितोषिक सुद्धा मिळाले आहे.
खेड्यांतील उद्योजकतेच्या वाढिसाठी त्यांनी काही सहकार्यांच्या समेवत समुच्चित एन्व्हायरो टेक नावाची एक खासगी कंपनी देखिल सुरू केली आहे. त्यांचा पत्ता :
समुच्चित एन्व्हायरो टेक प्रा.लि., फ्लॅट नं.6,
एकता पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी,
लॉ कॉलेज रोड, पुणे 411 004.

त्या म्हणतात की टाकाउ पदार्थां पासून मिळवलेली स्वच्छ निळ्या ज्योतीची उर्जा प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध करणे हे त्याचे ध्येय आहे.
( त्यांचे वडील डॉ. आनंद कर्वे हे डॉ. दि. धों. कर्वे व डॉ. इरावती कर्वे ह्यांचे पुत्र. अर्थात त्या भारतरत्न म. धोंडो केशव कर्वे, श्री. र. धों. कर्वे,जाई निंबकर, गौरी देशपांडे अश्या प्रसिद्ध मंडळींचा वारसा लाभलेल्या; महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कर्वे घराण्यातील आहेत. )
काही Links:
1. उर्जेच्या तिढ्यावर कच‍र्याच उत्तर - डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
2. निसर्गातिल उर्जा - डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
3. डॉ. आनंद कर्वॆ यांची मुलाखत.

2 comments:

  1. this is first most informative blog i have ever come across in so many days!! it a really good piece of work!!

    ReplyDelete
  2. this is most informative blog i have ever come across ,really good piece of work!!

    ReplyDelete