Monday, January 5, 2009

कॅलेंडर चे गणित

नवीन वर्ष म्हणजे नवे उपक्रम, नवे संकल्प, नवी रोजनीशी आणि नवी दिनदर्शिका.
परंतु
यंदा मी कागदाचा वापर कमी करायचा संकल्प केला आहे.
सुरूवात
कॅलेंडर वापरण्यापासून करायची आहे. एखाद्या दिवसाचा वार काढण्याच्या अनेक पद्धती प्रसिद्ध आहेत. अर्थात प्रत्येक पद्धतीत काही भाग आकडेमोडीचा आणि काही भाग स्मरण शक्तीचा असतो. आकडेमोडीत मुख्यत: 7 व त्याच्यापटीतील 14, 21 आणि 28 मिळवावे लागतात कारण कोठल्याही दिवसानंतर 7 ( अथवा 14,21,28,...) दिवसांनंतर वार तोच असतो.
आकडेमोड
खूपच कमी पण स्मरण शक्तिला थोडासा ताण देण्याची एक पद्धत :
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारची तारीख काढा. अर्थात पहिल्या रविवारची तारीख 7 पेक्षा जास्त नसणार. ( सिद्ध करा ! )
2009 साठी पहिल्या रविवारच्या तारखा पुढिलप्रमाणे आहेत :
4,1,1,5,3,7,5,2,6,4,1,6
समजा आपल्याला 15 ऑगस्टचा वार काढायचा आहे
वरील माहितीप्रमाणे ऑगस्टचा पहिला रविवार 2 तारखेला आहे.
2+14=16
म्हणून 16 तारखेला पण रविवार असणार. म्हणजे 15 तारखेला शनिवार !
आली का पद्धत लक्षात ?
आता प्रश्न उरतो 12आकडे पाठ करण्याचा, त्याची एक रित :
12 आकडे पुढिल प्रमाणे लिहा:

4,1,1,
5,3,7,
5,2,6,
4,1,6

किंवा
411,
537,
526,
416

ह्या रितीने 12 आकडे लक्षात ठेवणे सोपे जाते.( लक्षात ठेवण्याच्या या पध्दतिला इंग्रजित chunking म्हणतात पण मराठी प्रतिशब्द मला माहित नाही, सध्यापुरत म्हणुया माहितीच्या जुड्या बनवणे.)

No comments:

Post a Comment